Kolhapuri Misal Marvel Masala is a specially crafted spice blend designed to capture the authentic taste of Kolhapuri Misal, a beloved Maharashtrian delicacy. This masala is a perfect harmony of bold flavors, aromatic spices, and a hint of heat that makes every bite of misal irresistible. Whether you’re preparing misal for a hearty breakfast or a festive gathering, this blend ensures an authentic and flavorful experience.
साहित्य:
• बारीक शेव
• ¼ कप किसलेला सुका नारळ
• तेल
• २ मोठे चिरलेले कांद्याचे तुकडे
• ४-५ लसूण पाकळ्या
• १” बारीक चिरलेले आले
• १ बारीक चिरलेला टोमॅटो
• ३ टेबलस्पून Aromatix Kolhapuri Misal Marvel मसाला
• २५० ग्रॅम मटकी
• ½ टीस्पून हळद
• ४ ग्लास पाणी
• चवीनुसार मीठ
• थोडासा गूळ
• फरसाण
• बारीक चिरलेला कांदा
• बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती:
नारळ भाजणे:
मध्यम आचेवर तवा गरम करा. त्यात सुके खोबरे घाला आणि गुलाबीसर होईपर्यंत भाजा. भाजलेला नारळ मिक्सरच्या भांड्यात काढा.
मसाला तयार करणे:
त्याच तव्यावर १ चमचा तेल गरम करा. त्यात चिरलेला कांदा, लसूण आणि आल्याचे तुकडे घाला.
कांदा गुलाबीसर होईपर्यंत ५-६ मिनिटे परतून घ्या. त्यात चिरलेला टोमॅटो घाला आणि ४-५ मिनिटे मऊ होईपर्यंत परता.
गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या. थंड झाल्यावर हे मिश्रण भाजलेल्या नारळासोबत मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
मसाला परतणे:
पॅनमध्ये १ टेबलस्पून तेल गरम करा. वाटलेला मसाला त्यात घाला आणि ३-४ मिनिटे मध्यम आचेवर परता.
त्यात ३ टेबलस्पून ३ टेबलस्पून Aromatix Kolhapuri Misal Marvel मसाला घाला. मसाल्याचा तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्या.
मटकी शिजवणे:
मटकीला पाणी, हळद आणि मीठ घालून कुकरमध्ये मध्यम आचेवर १ शिट्टी येईपर्यंत शिजवा. मटकी जास्त शिजवू नका.
मिसळ तयार करणे:
शिजवलेली मटकी (पाण्यासहित) तयार मसाल्यात घाला आणि व्यवस्थित मिसळा. लागेल तसे पाणी घाला. तुम्ही मटकी थेट कटमध्येही शिजवू शकता. चवीनुसार मीठ आणि गूळ घाला. (गूळ ऐच्छिक आहे.) मध्यम आचेवर ७-८ मिनिटे उकळा. गॅस बंद करा. तुमचा कट तयार आहे.
मिसळ सर्व्ह करणे:
एका बाऊलमध्ये आधी मटकी टाका. आवडत असल्यास त्यावर उकडलेली बटाटा भाजी किंवा पोहे घाला. त्यावर भरपूर फरसाण आणि मिसळ कट घाला. त्यावर बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर पेरा. बारीक शेव घालून सजवा.
मिसळ लाडी पाव, कांदा, कोथिंबीर आणि लिंबाच्या फोडीसोबत गरमागरम सर्व्ह करा.
झणझणीत कोल्हापुरी मिसळ तयार! 😋🔥
Ingredients:
• 1/4 cup grated, dry coconut
• Oil
• 2 big slices Onion
• 4~5 Garlic cloves
• 1” finely chopped Ginger
• 1 finely chopped Tomato
• 3 tbsp Aromatix Kolhapuri Misal Marvel masala
• 250 gms Mataki
• 1/2 tsp Turmeric powder
• 1/2 tsp Salt
• 4 glasses Water
• Salt to taste
• A little Gudh / Jagger
• Farsan
• Finely chopped onion
• Finely chopped Coriander leaves • Fine Shev
Method:
• Heat up a pan on medium heat. Add coconut and roast until it gets reddish colur.
• When done, take it out into a blender pot.
• In the same pan add 1 tsp oil. Add slices onion, garlic and ginger.
• Fry on medium heat until onion gets reddish color for about 5-6 minutes.
• Add tomato and fry for another 4-5 minutes until tomato becomes soft.
• Turn off the gas and when the mixture cools down, transfer it into blender jar which contains roasted coconut.
• Blend the mixture really good.
• Heat up 1 tbsp oil in a pan. Add blended masala and fry on medium heat for about 3-4 minutes.
• Add 3 tbsp Aromatix Kolhapuri Misal Marvel masala
• Mix well and fry until masala release oil.
• Take mataki, add water, turmeric powder and salt.
• Cook on medium heat until 1 whistle. Do not overcook the mataki.
• Add mataki along with water into masala. Mix well. Add water.
• You can also cook mataki in the kat itself.
• Add salt and gudh to taste. You can skip gudh if you don’t like.
• Boil misal on medium for 7-8 minutes.
• Turn off the gas and kat for misal is already.
• While serving, in a bowl add one layer of mataki at the base.
• You can add layers of boiled potato sabzi, pohe.
• Add lots of farsan and kat of misal.
• Add onion and finely chopped coriander.
• Garnish with fine shve. Serve with ladi pav, onion, coriander and slice of lemon. 😋🔥
Add comment